सुधीर गोखले
सांगली : तासगाव येथील इंदिरानगर परिसरातील सुरज उर्फ लाल्या दिनकर शिंदे (वय २० या) तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेने तासगाव हादरले आहे. पुतण्या, भावजय आणि अन्य दोघांनी या तरुणावर चाकूने वार केले या प्रकरणी भावजय जानकी दीपक शिंदे तिचा मुलगा गोपाळ याना अटक करण्यात आली आहे. जतीन (संपूर्ण नाव समजले नाही) आणि अजय जाधव फरारी आहेत. तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिंदे कुटुंब इंदिरानगर येथे एकत्र राहायला आहे मात्र काही दिवसांपासून सुरज याचा भावजय आणि पुतण्या बरोबर वाद सुरु होता. गुरुवार दि १ रोजी सकाळी दहा वाजता घरातून वस्तू घेऊन गेल्याच्या रागातून सुरज याला संशयित चौघांनी बोलावून घेतले त्यानंतर सुरज वर चौघांनी चाकूने पाच वार करून त्याचा निर्घृण खून केला सुरज उर्फ लाल्याच्या गळ्यावर, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर, उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करण्यात आले रक्ताच्या थारोळ्यातच सुरज कोसळला अनु मृत्युमुखी पडला.
खुनाची माहिती मिळताच तासगाव पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व तपासाची चक्रे वेगाने फिरली याप्रकरणी चोघांची नावे निष्पन्न झाली मृत सुरज याचा पुतण्या व भावजय याना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य अन्य दोघे फरारी आहेत सहायक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे अधिक तपास करीत आहेत.