वरवंड, दौंडे : दौंड तालुक्यातील वरवंड येथे एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. खुनाची ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या व्यक्तीचे नाव शैलेंद्र कुमार विमल असे असून तो ३३ वर्षांचा होता. वरवंड परिसरात तो भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होता. वरवंड येथील एका शेतामध्ये त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
वरवंड या ठिकाणी अनेक वर्षांपासून शैलेंद्रकुमार हा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होता. सध्या तो वरवंड येथे वास्तव्यास होता मात्र तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवाशी होता.