मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
मुंबईमध्ये असणाऱ्या फोर्ट परिसरात दाट लोकवस्तीत असणाऱ्या भानुशाली हि इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीमधून आत्तापर्यंत 26 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून 6 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
हि दुर्घटना काल गुरुवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली आहे.
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही लोक दबले असल्याची भीती वर्तवली जात आहे .
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली करून नागरिकांना बाहेर काढण्याबाबत सूचना केल्या.