दौंड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महावितरणच्या केडगाव विभागीय कार्यालय अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असून याबाबतची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी दिली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे 75 वर्ष पूर्ण होत असून केडगाव विभागीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी रक्तदान केले आहे. केडगाव विभाग अंतर्गत असणाऱ्या विद्युत केंद्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शिरूर आणि केडगाव या दोन्ही उपविभागातील विद्युत केंद्रांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये उत्कृष्ट असणाऱ्या विद्युत केंद्रास प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
केडगाव विभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व शाखा कार्यालयामध्ये महावितरणच्या विविध योजना व त्यांची माहीती ग्राहकांना देण्यात येत आहे. महावितरण आपल्या द्वारी या योजनेअंतर्गत घरगुती व कृषी पंप जोडणी करण्यात आली आहे. केडगाव विभाग अंतर्गत एक गाव-एक दिवस या मोहिमेअंतर्गत माझे विद्युत रोहित्र माझी जबाबदारी योजना राबवत विद्युत रोहित्रांची सफाई व किरकोळ दुरुस्ती करण्यात आली आहे.
केडगाव विभागीय कार्यालांतर्गत असणारे सर्व अधिकारी कर्मचारी व बाह्यश्रोत कर्मचारी यासाठी कोविडच्या बुस्टरडोस घेण्याचा कॅम्प ही घेण्यात आला आहे.