अब्बास शेख
दौंड : आज दौंड नगरपरिषदेच्या उपनराध्यक्ष आणि तीन स्विकृत नगरसेवकांची निवडकरण्यात आली. या निवडीमध्ये उपनगराध्यक्ष पदी कुल गटाच्या सौ. छाया थोरात यांची निवड करण्यात आली तर स्विकृत सदस्यपदी कुल गटाचे ॲड.अमोल काळे, राजू बारवकर तर थोरात गटाचे रुपेश राजेश जाधव यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया अतिशय खेळीमेळीत पार पाडली.

ही निवड प्रक्रिया सर्वसाधारण सभा बोलवून नगरपरिषदेमध्ये पार पडली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे, मुख्याधिकारी अवधूत साहेबराव तावडे हे उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची तसेच स्वीकृत नगरसेवक सदस्यांची निवड ही दुर्गादेवी जगदाळे व मुख्याधिकारी तावडे यांच्या उपस्थितीत निवड पार पडली.
उपनगराध्यक्षपदी सौ. थोरात तर स्वीकृत सदस्यपदी जाधव, बारवकर व काळे यांची निवड करण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते सर्व नगरसेवक, नगरसेविका व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर तसेच सभा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.







