आमदार ‘राहुल कुल’ यांचा ‘वाखारी’ च्या युवा कार्यकर्त्यांकडून ‘सत्कार’

दौंड : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांची सलग तिसऱ्यांदा आमदारपदी भरघोस मतांनी निवड झाल्याने वाखारी येथील युवकांनी त्यांचा शाल, नारळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

आमदार राहुल कुल हे कामानिमित्त वाखारी परिसरात आल्यानंतर त्यांना त्यांच्या युवा कार्यकर्त्यांनी हॉटेल सह्याद्री येथे भेटीचे निमंत्रण दिले. आ.कुल यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देत तेथे सर्वांची भेट घेतली. यावेळी सर्व युवा कार्यकर्त्यांकडून आ. राहुल कुल यांचा सत्कार करण्यात आला. या भेटी दरम्यान निवडणूक काळातील अनेक गमतीदार किस्से कार्यकर्त्यांनी दादांना एकविल्याने सर्वचजन खळखळून हसताना पहायला मिळाले.

मुंबई येथे विधानसभा शपथविधी आणि विशेष अधिवेशन कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार राहुल कुल हे काल रात्री उशीरा मुंबईवरून राहू येथील आपल्या निवास्थानी पोहोचले. त्यांना आज सकाळी तालुक्यातील अनेक नागरिक येऊन भेटले त्यावेळी त्यांचे प्रश्न सोडविण्यास आ. कुल यांनी प्राधान्य दिले.