अब्बास शेख
केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील वाखारी येथे असणाऱ्या पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आमदार राहुल दादा कुल यांनी भेट
देऊन नित्य नियमाने सुरु असलेल्या काकड आरती कार्यक्रमाचे आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट च्या सर्व संचालकांचे कौतुक केले.
यावेळी ट्रस्टच्या वतीने आमदार राहुल कुल यांचा सत्कार ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत सुरेश इनामदार व सचिव दिगंबर संतोष इनामदार यांनी केला तर वाखारी येथे विकास निधी उपलब्ध करून गावच्या विकासाला हातभार लावल्याबद्दल आ.कुल यांचा उपस्थित ग्रामस्थांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष राहुल अशोक इनामदार, भीमा पाटस चे माजी संचालक धनाजी शेळके, उपसरपंच गणेश शेळके, सरपंच काळूराम केंजळे, अक्षय शेळके, औदुंबर इनामदार, हनुमंत जगताप, अमर शेळके, उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे आभार किरण जगताप यांनी मानले.