रोटी घाटात श्री सद्गुरू नारायण महाराजांचे स्मारक तर श्री क्षेत्र पंढरपूर येथे दौंडकरांसाठी वारकरी भवन उभारणार : आ. राहुल कुल

अब्बास शेख

दौंड : श्रावणमास निमित्त कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व कीर्तन महोत्सवाचे सांगता समारंभ आज यवत येथे पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आपल्या तालुक्यातून जात असून, आपल्या दौंड तालुक्याला देखील मोठा सांप्रदायिक वारसा लाभला आहे. त्यामुळे तालुक्यातील गायक, वादक, भजनी मंडळांना व्यासपीठ मिळावे या हेतूने या स्पर्धा व कीर्तन महोत्सव भरविण्यात आला आहे. तालुक्यातील २५० हून अधिक मंदिराच्या समोर सभामंडप बांधकाम जीर्णोद्धार, मंदिरांसाठी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत निधी, मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणे यासाठी आ. कुल यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

दौंड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन भुलेश्वर मंदिराला वन पर्यटनमधुन निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे दौंड   तालुक्याचे वारकरी भवन नसून भाविकांच्या सोयीसाठी तेथे वारकरी भवन उभारणार असल्याचा तसेच ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी मागणी केल्याप्रमाणे रोटी घाटात श्री. सद्गुरू नारायण महाराजांचे स्मारक उभारणार असल्याचा विश्वास आ. राहुल कुल यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

यावेळी माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल, ह. भ. प. गुरुवर्य श्री. सुदाम गोरखे गुरुजी, ह. भ. प. श्री. सुमंत महाराज हंबीर, ह. भ. प. श्री. सुरेश महाराज साठे, ह. भ. प. श्री. गुलाब महाराज लवंगे, ह. भ. प. श्री. नाना महाराज दोरगे, ह. भ. प. श्री. सोळसकर महाराज, ह. भ. प. श्री. दिपक महाराज मोटे, सौ. कांचन कुल यांच्यासह तालुक्यातील सर्व कीर्तनकार, मृदंगमनी, गायक, पेटीमास्तर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत एकूण ८० भजनी मंडळानी सहभाग घेताला असून त्यातील विजेते पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक – श्री. विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, (स्वामी चिंचोली)
द्वितीय क्रमांक – श्री. राजेश्वर भजनी मंडळ, (राजेगाव)
तृतीय क्रमांक – श्री. सावतामाळी भजनी मंडळ, (नानगाव)

उत्तेजनार्थ परितोषिक – श्री. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, (डाळिंब) स्वरांगण भजनी मंडळ, (गोपाळवाडी) बोराटेवस्ती भजनी मंडळ, (नांदुर) श्रीराम भजनी मंडळ, (केडगाव)

विभागीय विजेते – श्री. विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, (कामठवाडी)
भैरवनाथ भजनी मंडळ, (खडकी)
नागेश्वर भजनी मंडळ, (पाटस) संत यादव बाबा भजनी मंडळ (वडगाव बांडे) विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ (खोर) यादववाडी भजनी मंडळ (खामगाव) विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ  (पारगाव)