दौंड : ९ मार्च २०२० साली कोरोना महामारीची पहिली लाट राज्यात आली त्यातून लोक कसेबसे सावरत असताना पुन्हा मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. या लाटेने मात्र उग्र रुप धारण केले. अचानक आलेल्या या संकटाने सर्वजण हादरून गेले होते. मुलगा बापापासून दूर पळत होता तर भाऊ भावाला भेटू शकत नव्हता इतकी भयान परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक कुटुंब होते जे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दररोज लोकांना भेटत होते.
हे कुटुंब स्वतःचा जीव धोक्यात घालत होते अण प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाला बेड मिळावा, रेम डिसिवर, प्लाझ्मा मिळावे म्हणून अहोरात्र झटत होते ते कुटुंब होतं आमदार राहुल कुल यांचं. आता या गोष्टीला चार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे मात्र लोकांच्या स्मृतिमध्ये आजही ते दिवस आहेत. आमदार राहुल कुल, त्यांच्या पत्नी कांचन कुल आणि त्यांच्या मातोश्री माजी आमदार रंजना कुल यांनी कोरोना महामारीत लोकांसाठी जे कार्य केले ते सांगायचे झाले तर लाखो शब्द सुद्धा अपुरे पडतील.
आमदार राहूल कुल यांनी जे कोविड सेंटर उभारली, प्रत्येक रुग्णालयात कोरोना रुग्णांची योग्य देखभाल व्हावी म्हणून जे परिश्रम घेतले ते वाखांन्याजोगे होते. आमदार राहुल कुल यांनी त्या भयान परिस्थिमध्ये गट, तट पक्ष आणि राजकारण न पाहता प्रत्येकाला हे सहकार्य केले त्यावर त्यांच्या कट्टर विरोधक कार्यकर्त्यांनीही “आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ कुटुंब मदतीला नसते तर आज आम्ही जिवंत असतो का” अशी भावना व्यक्त केली आहे. आमदार राहुल कुल यांनी कोरोनाच्या लाटेमध्ये चौफुला येथील दिपगृहमध्ये कोविड सेंटर उभारले होते त्यामध्ये ३५०० कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे याठिकाणी उपचार घेणारा एकही रुग्ण दगावला नाही. येथील रुग्णांना मोफत औषधोपचारासह सकाळचा नाश्ता, दुपारी आणि रात्रीचे जेवण मोफत दिले जात होते. ३५ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची टीम तेथे राबत होती. तर आ.कुल यांचे कार्यकर्ते तेथे दिवसरात्र हजर राहून लोकांची देखभाल करायचे.
आसपासच्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत दौंड तालुक्यात विविध ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी आमदार राहुल कुल व त्यांचे कुटुंबीय भेट देऊन रुग्णांना योग्य ते उपचार दिले जात आहेत ना आणि त्यांना कुठली अडचण तर नाही ना याची माहिती घेत रहायचे. या सर्व धामधूमीत एकवेळ अशी आली कि आमदार राहुल कुल, कांचनताई कुल, माजी रंजनाताई कुल आणि आ.राहुल कुल यांची दोन्ही मुले कोरोना बाधित झाली. हे सर्व घडले तरीही आ.राहूल कुल यांनी जीवाची पर्वा न करता लोकांना मदत करणे चालूच ठेवले. या काळात निकटचे नातेवाईक रुग्णाला भेटायला टाळाटाळ करायचे त्या रुग्णांची हे कुटुंब आवर्जून भेट घेऊन त्यांना धीर आणि दिलासा देण्याचे काम करत होते.
तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो… याबाबत बोरिपार्धी येथील रहिवासी रियाज सय्यद आणि त्यांची पत्नी शन्नो यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची आणि आमदार राहूल कुल यांच्याकडून झालेल्या अनमोल मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट संपत आली होती त्यावेळी अचानक रियाज सय्यद आणि त्यांची पत्नी शन्नो सय्यद यांना कोरोनाची लागण झाली. रियाज सय्यद यांचा स्कोर अगोदर १८ आणि नंतर २३ तर शन्नो हिचा स्कोर १० आला होता. घरात तीन लहान मुली आणि अल्पशा शेतीवर उदरनिर्वाह अशी त्यांची बिकट अशी आर्थिक परिस्थिती होती. अगोदर या दोघांना यवत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे रियाजभाई यांची आणखी परिस्थिती बिघडली. १८ वरून स्कोर २३ पर्यंत पोहोचला ज्यामुळे जीवन मृत्युची लढाई सुरु झाली. अश्या परिस्थितीमध्ये कुठेही व्हेन्टीलेटर आणि उच्च सुविधायुक्त रुग्णालय उपलब्ध होत नव्हते. अश्यावेळी आमदार राहुल कुल हे मदतीला धावून आले त्यांनी केडगाव येथील डॉ.भांडवलकर यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या रुग्णाला अॅडमिट करून त्यावर उपचार करावे अश्या सूचना दिल्या.तर शन्नो सय्यद यांना आपल्या कोविड सेंटरमध्ये भरती केले. रियाज सय्यद यांच्यावर डॉ.भांडवलकर यांनी उपचारांची पराकाष्ठा करत अखेर या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. आजही सय्यद कुटुंबीय आ.राहूल कुल यांचे गुणगान करताना थकत नाही.
त्यावेळी कोणतीही निवडणूक नव्हती कि त्यांना स्वतःची टिमकिही मिरवायची नव्हती. उलट या कृतीने त्यांना कोरोना बाधित होण्याचा धोका कायम राहत होता मात्र त्याची पर्वा न करता आमदार राहुल कुल यांनी प्रत्येकाला जी मदत केली त्याबाबत हा संपूर्ण तालुका त्यांना कायम स्मरणात ठेवेल. आजही आरोग्यदूत आमदार कुल यांचे हे कार्य असेच सुरु असून त्यांच्या या कार्याला विरोधकही दाद देतात हे विशेष.