Categories: आरोग्य

मिरज शहरात ‘कोरोना’ ची ‘एंट्री’ मनपा क्षेत्रातील रुग्णांची संख्या ‘तीन’

सुधीर गोखले

सांगली : संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना ने परत आपले डोके वर काढले आहे. जे एन १ या नव्या व्हेरियंटने आता दहशत पसरवायला सुरुवात केली असून काल मिरजेतील कमानवेस परिसरात एका महिलेला लागण झाल्याचे समोर आले आहे. या महिलेसह महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या ३ वर पोचली आहे तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास ३७ जणांची आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्यात आली असून याचा अहवाल आज मिळण्याची शक्यता आहे. महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्य विभागाने तातडीने सुरक्षेचे उपाय राबवायला सुरुवात केली असून आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.वैभव पाटील यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाने मनपा क्षेत्रात सर्दी खोकला ताप असणाऱ्या रुग्णाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या कमानवेस परिसरातील बाधित महिलेची जे एन १ व्हेरियंट ची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून आठ दिवसांनी प्राप्त होईल मात्र महापालिकेने खबरदारी म्हणून या महिलेस विलगीकरण कक्षात ठेवले आहे तसेच महापालिका क्षेत्रात प्रथमतः आढळून आलेल्या दाम्पत्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील यांनी सहकारनामा शी बोलताना सांगितले तसेच कोणीही या नव्या व्हायरन्ट मुळे घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेऊ नये मात्र खबरदारी घ्या आपले हात पाय स्वच्छ धुवा सर्दी खोकला ताप अंगावर ना काढता तातडीने वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार घ्या असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

डासांचा वाढता प्रादुर्भाव
महापालिका क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात डासांचा लक्षणीय प्रादुर्भाव वाढला असून महापालिका क्षेत्रामध्ये वेळोवेळी डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच काही ठिकाणी खाजगी मालकीच्या खुल्या भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडी वाढल्यानेही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासंबंधी सहकारनामा ने आरोग्य अधिकारी (घनकचरा व्यवस्थापन) डॉ रवींद्रकुमार ताटे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही अशा खाजगी प्लॉट धारकांना वेळोवेळी त्यांचे प्लॉट स्वच्छ करून घेण्यासाठी नोटीस पाठवत असतो असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या प्रत्येक प्रभागात एक ते दोन दिवसाआड आम्ही डास प्रतिबंधक औषध फवारणी मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago