आमदार ‘राहुल कूल’ यांच्या पाठपुराव्याला मोठे ‘यश’, अल्पसंख्यांक समाजासाठी 1कोटि 50लाख रुपयांचा ‘निधी’ मंजूर

पुणे : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने आणि अल्पसंख्याक मंत्री मा.नवाब मलिक यांच्या सहकार्याने दौंड तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम आणि ख्रिश्चन) दफनभूमी आणि मस्जिद परिसरात पायाभूत सुविधा करण्याकरिता सण 2021-22 या आर्थिक वर्षात जवळपास एक कोटी पन्नास लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

तसेच स्थानिक आमदार निधीतून आमदार राहुल कुल यांनी वीस लक्ष पन्नास हजार रुपयांची कामे मंजूर केली आहेत. मंजूर केलेली कामे खालील प्रमाणे-
यवत गावठाण मस्जिद पायाभूत सुविधा-२० लक्ष

केडगाव गावठाण मस्जिद परिसर -५ लक्ष रुपये

• यवत मुस्लिम दफनभूमी पायाभूत सुविधा-१० लक्ष
नानगाव दफनभूमी-१० लक्ष
• पाटस येथे मुस्लिम शादीखाना- २५ लक्ष
• खामगाव येथे मुस्लिम शादीखाना- २० लक्ष
• गिरीम दफनभूमी-१० लक्ष
• कुरकुंभ दफनभूमी -१५ लक्ष
• दौंड युनायटेड ख्रिश्चन दफनभूमी संरक्षण भिंत-२५ लक्ष
• दौंड नॉर्टन चर्च रस्ता करणे-१५ लक्ष
तसेच आमदार फंडातून मंजूर कामे- १) दौंड येथील मुस्लिम समाजातील लोकांसाठी अंबुलन्स गाडी-७.५० लक्ष रुपये
• नानगांव मस्जिद सुशोभीकरण- ३ लक्ष रुपये
• वरवंड मस्जिद परिसर – ५ लक्ष रुपये
अल्पसंख्यांक समाजासाठी इतका मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण दौंड तालुक्यातील अल्पसंख्यांक बांधवांनी आमदार साहेब आणि मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.