दौंड : बायकोने माहेरहुन डीजे सिस्टीम व गाडी घेण्यासाठी चार लाख रुपये आणावेत म्हणून पतीने व त्याच्या कुटुंबीयाने तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली असून संदीप जगन्नाथ शितोळे, जगन्नाथ भानुदास शितोळे, शोभा जगन्नाथ शितोळे, महेश जगन्नाथ शितोळे (सर्व रा. धुमाळवस्ती, आलेगाव) यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आपल्या घरून डीजे सिस्टीम व गाडी घेण्यासाठी चार लाख रुपये घेऊन यावेत म्हणून फिर्यादीस आरोपींनी उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे आई, वडील भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दौंड पोलिसांनी संबंधितांविरोधात 498 अ, 324, 323, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पो.ना. वारे करीत आहेत.