मुंबई : मराठी चित्रपटातील गुणी, सोज्वळ अभिनेत्री यांचं वयाच्या 81 वर्षी निधन झालं आहे. सीमा देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. दिवंगत चित्रपट अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या तर अभिनेता अजिंक्य देव हे त्यांचे पुत्र आहेत.
त्या अल्झायमर या आजाराने त्या ग्रस्त होत्या. ‘सरस्वतीचंद्र’ (1968), ‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ (1977) या हिंदी चित्रपटांमध्येही सीमा देव यांनी काम केले होते. अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या.
सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे शेयर करत आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केले होते.