पुणे : राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज पहाटे ही घटना उघडकिस आली आहे.
आज पहाटे येरवडा जेलमध्ये पोलीस गस्त सुरु असताना आत्महत्या केल्याचा हा प्रकार उघडकीस आला.
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपर्डी येथील हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेत एका मुलीचा बलात्कार करून नंतर निर्दयीपणे खून करण्यात आला होता ज्यामुळे मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
काय होते प्रकरण…
13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. यातील आरोपिंना कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्यात जागोजागी निदर्शने करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणातील जितेंद्र शिंदे याच्यासह तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन दि. 29 नोव्हेंबर 2017 रोजी अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने वरील आरोपिंना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.