हे ‛दिवाळी’ गिफ्ट नाही तर ‛पराभव’ गिफ्ट आहे! महागाई कमी करायची असेल तर जनतेनं ‛हा’ निर्णय घ्यावा.. वाचा महाविकास आघाडीचे नेते काय-काय बोलले

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल 5 तर डिझेलवरील कर 10 रुपयांनी कमी केल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती थोड्याफार का होईना कमी झाल्या आहेत. मात्र, केंद्रसरकार ने आत्ता अचानक हा निर्णय का घेतला असेल याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप, केंद्रसरकारवर टीका करताना, केंद्र सरकारने मोठं मन दाखवलंच नाही, कारण मोठं मन असायला मन असावं लागतं, असं म्हणत केंद्रसरकार ने किमान 25 रुपये आणि नंतर 50 रुपये कमी करायला हवे होते तर मग कुठेतरी मोठं मन केलं असं म्हणता आलं असत. 50 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे याला कठोर मन म्हणतात असे म्हणून केंद्राकडे मोठे मन नाही तर सडके मन आहे अशी टीका केली.

मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना जेवढे भाजपाला पराभूत कराल तेवढे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे त्यामुळे जनतेने आता महागाई कमी करण्यासाठी भाजपला पराभूत करायला हवे असा टोला लगावला आहे.
भाजपच्या पोटनिवडणुकांमधील पराभवामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे अशी टीका त्यांनी करत भाजपला पराभूत करत रहा त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत राहतील असे मलिक यांनी म्हटले आहे.

आमदार रोहित पवार यांनी केंद्राने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने राज्याचेही पेट्रोलवरील 1 रुपया आणि डिझेलवरील 2 रुपये कमी होतील असे म्हणत कदाचित देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी झटका दिल्यानंतर केंद्र सरकारला उशिरा का होईना दिवाळीच्या निमित्ताने जाग आली हे महत्वाचं आहे, त्यामुळे आपण जनतेचे आभार मानतो असे म्हटले आहे.