रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, 13 राज्यातील पोटणीवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी त्यामुळे देशात पेटवापेटीवच राजकारण

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू! मुस्लिमांमध्ये या आकादमीला स्थान नाही, मात्र भाजपच्या सांगण्यावरून रझा अकादमी काम करते : संजय राऊत

औरंगाबाद : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेवरून राज्यात काही ठिकाणी काल आंदोलन झाले त्यामध्ये काहीजागी आंदोलक हिंसक होऊन दगडफेक झाली होती. आज अमरावती आणि इतर ठिकाणी कालच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात येऊन दुसऱ्या बाजूनेही दगडफेक आणि दुचाक्या, दुकाने तोडफोडीचे प्रकरण समोर आले आहे.

या सर्व गोष्टींना भाजप जबाबदार असल्याचे खा.संजय राऊत यांनी म्हटले असून 13 राज्यातील पोटणीवडणुकीतील पराभव ही भाजपची खरी अस्वस्थता आहे आणि त्यामुळे देशात पेटवापेटीवच काम सुरु झालं आहे. राज्यात कालपासून जे काय होतंय तो एक पूर्वनियोजित प्लॅन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्या रझा अकादमीला मुस्लिम समाजात स्थान नाही, त्यांना कुणी मानत नाही ते भाजप चे पिल्लू असून भाजपच्या इशाऱ्यावर ते काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे.

कालच्या हिंसक आंदोलनाच्या निषेधार्थ आज काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला हिंसक वळण लागून दुचाक्या, दुकानांची तोडफोड करण्यात येत आहे. हे सर्व एक पक्ष जाणून बुजून करत असून त्यांना देशात असे वातावरण तयार करायचे असल्याचे यावेळी खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे.