Categories: Previos News

Leopard : रात्री दिसलेला बिबट्या, दिवसा निघालं कुत्रं..



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे त्यामुळे या परिसरात सध्या घबराट पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये बिबट्या दिसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मात्र याच बिबट्याच्या भीती पोटी म्हणा किंवा घाई गडबडीमध्ये म्हणा नागरिकांना प्रत्येक प्राणी हा बिबट्याच असल्याचा भास होतो आणि मग यातून नवीनच काल्पनिक कथा जन्म घेते आणि मग सुरू होतो अफवांचा पाऊस.

केडगावमध्येही काल रात्री बिबट्याच्या भीतीमधून अशीच एक घटना घडली आहे. काही युवक काल मध्यरात्रीच्या वेळी केडगाव स्टेशन ते कृषी उत्पन्न बाजार समिती रोडने चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी त्यांना रात्रीच्या अंधारात हॉटेल रॉयल जवळ एक बिबट्या सारखा  प्राणी रस्त्याने चालत जात असल्याचे दिसले.

या युवकांनी लागलीच गाडी त्याच्या मागे घेऊन गाडीचा फोकस काही अंतरावरून त्यावर रोखून धरला आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ काढले. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ते फोटो आणि व्हिडीओ केडगाव परिसरातील हॉटेल रॉयल जवळ  बिबट्या आढळला या नावाने फिरू लागले.

मात्र याबाबत सतीश बारवकर आणि इतर काही नागरिकांनी याची अधिक माहिती गोळा केली असता, रात्री युवकांना दिसलेला तो प्राणी बिबट्या नसून तेथील एक फिरस्ते कुत्रे असल्याचे त्यांना समजले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

मात्र इतके होऊनही अजूनही ती पोस्ट सोशल मीडियावर फिरतच असून रात्री दिसलेला तो बिबट्या नसून कुत्रा आहे हे सांगणाऱ्यांनाही आता हसू आवरेनासे झाले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago