दौंड : दरोडा गुन्ह्यातील ९ वर्षापासून फरार आरोपी LCB कडून जेरबंद



दौंड : सहकारनामा ऑनलाइन.

दरोडा गुन्ह्यातील ९ वर्षापासून फरार असलेला आरोपी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या LCB पथकाकडून जेरबंद करण्यात आला आहे. बाबू उर्फ बाब्या पंडीत काळे असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव असून तो श्रीगोंदा, कोथिंबिरे मळा, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर.  मुळ रा.बाभूळसर ता.शिरूर जि.पुणे येथील रहिवासी आहे. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पो.हवा.महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.ना.सुभाष राऊत, गुरु गायकवाड, प्रविण मोरे, अक्षय जावळे यांनी केलेली आहे. सदर आरोपीवर दोंड पोलीस स्टेशममध्ये  २०११ साली भादंवि क.३९९, २०१९ भादंवि क.३०२,३०७,३४ तर  श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे  २०१६ रोजी भादंवि क.३९९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन दोैंड पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे.