पुणे-सातारा रोडवर वाघाची कातडी विकणारी टोळी LCB ने केली जेरबंद, 4 आरोपींकडून 5 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त



|सहकारनामा|

पुणे : दिनांक ०१/०८/२०२१ रोजी  मा.पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपीनाय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहेत .

सदर गोपनीय माहितीचे आधारे सारोळा ब्रिज इथे सापळा लावून वाघाच्याकातडी  विक्रीसाठी आलेल्या ४ इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) दिनेश अशोक फरांदे (वय 38 रा.मु पो ओझर्डे) ता.वाई जि. सातारा 2) हसन रज्जाक मुल्ला (वय 35 रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा) 3) गणपत सदू जुनगरे (वय 45 रा.देवदेव पो.मामुर्डे ता.जावळी जि. सातारा) 4) सुनील दिनकर भिलारे (वय 52 रा.भिलार ता.महाबळेश्वर जि. सातारा) अशी असल्याचे सांगितले.



त्यांच्या ताब्यातील 4 फूट लांबीचे , दीड फूट रुंदीचे,वरच्या जबड्यात 13 दात व खालच्या जबड्यात 16 दात  असे एका पट्टेरी वाघाचे कातडे , एक मोटारसायकल व 4 मोबाईल फोन असे एकूण 5, 26,100 किमतीचा मुद्देमाल मिळून आला, सदर बाबत नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना कळवण्यात आले आहे. व आरोपींना पुढील कारवाई कामी राजगड पो स्टे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि माने, पोसई अमोल गोरे, पो हवा ज्ञानेश्वर क्षीरसागर, पो ना गुरू जाधव, पो कॉ अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, मपोकॉ पूनम गुंड चालक प्रमोद नवले यांनी केली आहे.