Categories: Previos News

‛सहकारनामा’च्या बातमीचा इफेक्ट – वाटमारी करणाऱ्या आरोपींना LCB ने केले जेरबंद, 2 लाख 26 हजारांचा लुटलेला मुद्देमाल हस्तगत



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड शहर आणि परिसरामध्ये अधिकारी आणि वाहन चालकांना अडवून त्यांची लूटमार करणारी टोळी सक्रिय झाली होती, याबाबत सहकारनामा ने दौंड शहर व परिसरात चोरांचा हैदोस, लुटारू मात्र अजून मोकाटच या सदराखाली बातमी केली होती. या बातमी नंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत या वाटमारी करणाऱ्या लुटारूंना जेरबंद केले आहे. 

दि.५/१२/२०२० रोजी रात्री ०९.३० वा.चे सुमारास फिर्यादी संजय मिश्रीलाल मुनोत (वय ५४) हे बार्शी येथून एसटीने कुरकुंभला उतरून दौंड येथे घरी जाणेसाठी थांबले असताना त्यांना एका मोटरसायकल वरील अनोळखी इसमाने दौंड येथे जाणेसाठी लिफ्ट देतो असे सांगुन त्याचे मोटरसायकलवर मागे बसवून भागवतवस्ती कॅनलपासुन कॅनलचे भरावावरुन फायर बटाकडे निर्जन स्थळी घेऊन गेला होता.

तेथे मोटारसायकलवर थांबलेले त्याचे दोन जोडीदार यांचेजवळ त्यांना घेऊन जाऊन या तिघांनी मिळून, ”फिर्यादीस दमदाटी करून सर्व काढुन दे, नाही तर भोकसुन टाकीन” अशी धमकी देवून त्याचे खिशातील रोख रक्कम रुपये १०,०००/-  तसेच दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, घड्याळ व मोबाईल असा किंमत रुपये १,९४,०००/- चा ऐवज जबरीने हिसकावून चोरी करुन घेवुन गेले होते.

याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पो.स्टे. गु.र.नं. ५७७/२०२० भादंवि क.३९२ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB पथक कुरकुंभ परिसरात करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओमकार गावडे (रा.बेटवाडी) व त्याचे साथीदार हे चोरीचे मोबाईल व अंगठ्या विकणेसाठी कुरकुंभ एसटी स्टँड समोर आलेले आहेत. त्यानुसार LCB पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून तेथे संशयास्पद रित्या मिळून आलेले १.ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे (वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड जि.पुणे) २.राजेश संभाजी बिबे (वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड) ३.अजय ज्ञानेश्वर पवार (वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे)  ४.विशाल दिलीप आटोळे (वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे) यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

या आरोपींकडून १ पल्सर मोटरसायकल, २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल व रोख रक्कम असा किं.रु. २,२६,२७०/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपी क्र.१ ते ३ यांनी मिळून प्लॅन करुन एका व्यक्तीस लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटल्याचे व त्यांचेकडे मिळालेल्या दोन अंगठया त्याच चोरीतील व पल्सर मोटरसायकल गुन्हा करताना वापरल्याचे सांगितले आहे. गुन्हयातील  चोरलेला मोबाईल हा आरोपी क.४ विशाल दिलीप आटोळे यास १०,०००/- रुपयाला विकल्याचे सांगितले. तो मोबाइलही त्याचेकडून हस्तगत केलेला आहे. 

सदर आरोपी क्र.१ ते ३ यांचेकडे आणखीन चौकशी करता त्यांनी सुमारे २० दिवसापूर्वी पहाटे ०४.०० वा.चे सुमारास कुरकुंभ एमआयडीसी पुणे-सोलापूर हायवे लगतचे शिवरत्न लॉजचे समोर लावलेल्या आयशर टेम्पोची काच फोडून टेम्पोत झोपलेल्या ड्रायव्हरचे डोक्यात काठीने मारुन त्यास कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचे डॅशबोड मधील २८००/- रुपये जबरीने चोरल्याचे सांगितले. सदर बाबत दौंड पो.स्टे. गु.र.नं. ५५०/२०२० भादंवि क . ३९४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपींकडून खालील 

१) दौंड पो.स्टे. गु.र.नं. ५७७/२०२० भादंवि क.३९२

२) दौंड पो.स्टे. गु.र.नं. ५५०/२०२० भादंवि क . ३९४,५०४,५०६ हे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

या पथकाने सदर आरोपींची वैदयकिय तपासणी करुन आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,  बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी श्री.राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पो.नि. पृथ्वीराज ताटे,

पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोना. गुरू गायकवाड, पोना. सुभाष राऊत, 

पोकॉ. दगडू विरकर यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago