इंदापुरात तालुक्यात गळ्याला चाकू लावून जबरी चोरी करणारे केडगाव आणि बिरोबावाडीचे दोघेजण LCB कडून जेरबंद : 1 लाख 42 हजारांचा ऐवज जप्त



पुणे : सहकारनामा ऑनलाईन


दिनांक 26 जुलै 2020 रोजी रात्रौ 11.00 वाजण्याचे सुमारास मौजे मदनवाडी ता.इंदापुर जि.पुणे या गावच्या हद्दीत मदनवाडी चौकात ब्रिजचे खाली अनोळखी आरोपींनी बिगर नंबरचे हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकलवर येवून फिर्यादी रोहन देविदास ढवळे (वय 24 वर्षे रा.टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापुर) व फिर्यादीचा मित्र कुणाल नागदेव यांचे गळ्याला चाकु लावुन त्यांना भोकसून टाकण्याची धमकी देत दोघांच्या खिशातील 2 मोबाईल फोन व रोख रक्कम 8500/- असा एकुण 22,500/- चा माल जबरदस्तीने हिसकावून घेवुन पळून गेले होते. त्याबाबत भिगवण पो.स्टे. गु.र.नं. 338/2020 भा.द.वि.का.कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

आज रोजी LCB टिमला भिगवण मदनवाडी उड्डान पुलाखाली ता.इंदापुर येथे दोघे इसम चोरीचे मोबाईल विकत असल्याची बातमी मिळालेने आरोपी नामे –

१) मारुती उर्फ काका नाना वायाळ (वय ३० वर्षे रा.बिरोबाची वाडी ता.दौंड जि.पुणे)

२) सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी (वय २८ वर्षे रा.केडगाव पिसेवस्ती ता.दौंड जि.पुणे) या दोघांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे चोरीचे १७ मोबाईल, गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल, १ चाकू रोख ४००० असा एकूण १,४२,०५०/- चा माल मिळून आलेने तो जप्त केलेला आहे.

सदर आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

1.भिगवण पो.स्टे. गु.र.नं. 338/2020 भा.द.वि.का.कलम 392,34

2.यवत पो.स्टे. गु.र.नं. 773/2020 भा.द.वि.का.कलम 392,34

यातील आरोपी सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी याचेवर यापूर्वी यवत पो.स्टे.ला गु.र.नं. ७३४/१९ भादंवि क.३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर दोन्ही आरोपी यांची वैदयकिय तपासणी करुन त्यांना भिगवण पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे. सदर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.ना.सुभाष राऊत, गुरु गायकवाड, चा.पोहवा. प्रमोद नवले यांनी केलेली आहे.