भिगवण (तुषार हगारे) : भिगवण स्टेशन येथील नियोजित उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून भिगवण – राजेगाव रोडवरील भिगवण स्टेशन येथील रेल्वे गेट बंद करून नियोजित उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असल्याने आता रेल्वे विभागाकडून भुसंपादनासाठी तातडीची मोजणी (दि,२१) जून रोजी नियोजित आहे. यामुळे रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी शेकडो ग्रामस्थांना भूसंपादन मोजणीच्या नोटीस आल्या आहेत.
भिगवण स्टेशन येथे नियोजित उड्डाणपुलाचे काम हे २०१५- १६ मध्ये मनोजा स्थापत्य या कंपनीला देण्यात आले होते. तत्कालीन कामाला ग्रामस्थांनी विरोध केल्याने भुसंपादन प्रक्रिया रखडल्याने मनोजा स्थापत्य कंपनीला नियोजित कालावधीत काम न झाल्याने ते काम आता महाराष्ट्र रेल इंफ्राट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या रेल्वेच्या अधिपत्याखालील कंपनी करण्यात येणार असल्याचे समजते. रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त होणार असल्यामुळे मागील काळात विरोध दर्शविल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया होवू शकली नव्हती परंतु आता पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्यात येणार असून यामध्ये ग्रामस्थ आणि भूसंपादन अधिकारी यांच्यात वाद होवू नये यासाठी पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे..!
दौंड तालुक्याच्या पुर्व भागाच्या गावांतील भिगवणला येण्यासाठी हा महत्त्वाच्या रोड असून वाहतूकीसाठी तसेच ये-जा करण्यासाठी रेल्वे फाकटात तासनतास अडखळत बसावे लागत होते यापासून पुढील काही वर्षात सुटका होईल.