Kolhapur | कोल्हापूर विमानतळाला लवकरच राजाराम महाराजांचे नाव ! प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवणार – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया

सुधीर गोखले

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

ना शिंदे हे शनिवार पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत परंतु ओरिसा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे त्यांनी शनिवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले रविवारी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. पत्रकार परिषदेमध्ये खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष शोमिका महाडिक उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री सिंदिया म्हणाले कि, कालच मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीची पाहणी केली दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत राजाराम महाराजांचे नाव या विमानतळाला देण्याबाबत प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र केंद्राला पाठवला असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल मिळाल्यावर पुढील प्रक्रिया करता येईल. मंत्री सिंदिया पुढे म्हणाले गेल्या नऊ वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये क्रांतिकारी परिवर्तन झाले असून प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत अव्वल होत आहे प्रगतीचे आकडे थक्क करणारे आहेत.

सन २०१४ च्या आधी देशात फक्त ६८ वर्षात देशात एकूण ७४ विमानतळे होती ती आता केवळ ९ वर्षात तब्बल आणखी ७४ विमानतळे झाली आहेत. हि संख्या २२० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. पूर्वी प्रतिदिन १३ किमी राष्ट्रीय महामार्ग बनायचे ते आता प्रतिदिन ३६ किमी बनत आहेत. कामाचा वेग तिपटीने वाढला आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये प्रगत राष्ट्रांमध्ये हातात नागरिक कागदपत्रे घेऊन फिरत असताना भारतात मोबाईल वरती कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट उपलब्ध झाले हि किमया नरेंद्र मोदींजींनी करून दाखवली असल्याचे शेवटी ते म्हणाले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago