कुसेगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील राजकीय दृष्टया चर्चेत असलेल्या कुसेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण मनोहर गायकवाड हे विजयी झाले आहेत.
उपसरपंच विनोद माणिकराव शितोळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दि.२१.०३.२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज सकाळी ११ वाजता सुरू झाली. ११ ते १२ दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. यासाठी सरपंच सह इतर सर्व सदस्य हजर होते. आजची उपसरपंच निवड प्रक्रिया सरपंच वैशाली रमेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या निवडणुकीत सचिव म्हणून काम पाहणारे ग्रामविकास अधिकारी संतोष कांबळे यांच्या निगराणीखाली सुरू झाली.
११वाजून ०५ मिनिटांनी किरण मनोहर गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज प्राप्त झाला. त्यांनतर सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी माजी सरपंच शर्मिला मनेश शितोळे यांचा अर्ज प्राप्त झाला. तसेच ११ वाजून १७ मिनिटांनी अमोल गणेश शितोळे यांचाही अर्ज प्राप्त झाला. नामनिर्देशन अर्जाची छाननी केली असता सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यांनतर दुपारी १२:३० ते १ पर्यंत अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने बहुमताने हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडली.
यावेळी डॉ.अमोल शितोळे यांनी किरण गायकवाड यांना पाठिंबा दिल्यामुळे माजी सरपंच शर्मिला मनेश शितोळे आणि किरण गायकवाड यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये किरण मनोहर गायकवाड यांना सहा मते मिळाली तर माजी सरपंच शर्मिला शितोळे यांना तीन मते मिळाली. किरण मनोहर गायकवाड यांना सर्वाधिक ६ मते मिळाल्याने त्यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले. किरण गायकवाड यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उत्तम रुपनवर सर, उद्योजक मोहन शितोळे, दादासाहेब बाबुराव शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सोनबा शितोळे, पोलीस पाटील गणेश शितोळे, मेजर काळूराम रुपनवर, सागर शितोळे, मनेश शितोळे, संजय गायकवाड, संतोष शितोळे,महेश रुपनवर,दत्तात्रय रूपनवर,शहाजी रुपनवर,योगेश रुपनवर,गणेश रुपनवर,विनोद रुपनवर,नवनाथ रुपवनर,अनिल रुपनवर,भानुदास रुपनवर,नागेश रुपनवर,नटराज गायकवाड,संदीप रुपवनर, शिवाजी रुपवनर, संतोष भोसले, गोट्या चव्हाण,तुषार चव्हाण,गणेश भोसले, नाना गायकवाड,दीपक गायकवाड, तुषार डूबे,गणेश रुपनवर,विराज गायकवाड,तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.