विलास थोरात आणि संदीप थोरात यांची खुटबाव वि.का. सोसायटी तज्ञ संचालकपदी निवड

दौंड : दौंड तालुक्यातील खुटबाव या गावातील खुटबाव वि.का. सोसायटी तज्ञ संचालकपदी विलास थोरात सर तसेच संदीप थोरात यांची निवड करण्यात आली.

दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते व माजी सरपंच शिवाजी बापू थोरात तसेच खुटबाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महेश थोरात यांच्या उपस्थितीत विलास थोरात सर व संदीप थोरात यांची खुटबाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या यावेळी उपसरपंच सुधीर थोरात, संचालक योगेश थोरात, संचालक कैलास गिरमे, अभिजीत जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.