केरळमधील अतिवृष्टी, भूस्खलनामुळे आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू, अनेकजण बेघर..जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख  व्यक्त

नवी दिल्ली :

केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.

केरळमध्ये धो धो पडणारा पाऊस आणि जमिनींचे भूस्खलन यामुळे आतापर्यंत 26 जणांचा जीव गेला आहे, या नैसर्गिक संकटामध्ये अनेक घरं वाहून गेली आणि कित्येक लोकं बेपत्ता झाले आहेत. केरळमधील कोट्टायम मध्ये पावसाचा सर्वात जास्त प्रभाव दिसून येत आहे. फक्त कोट्टायममध्येच आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम पाठोपाठ इडुक्कीमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अल्लाप्पुझा जिल्ह्यात 4 लोकांचा जीव गेला आहे, पावसामुळे, पठाणमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे

त्यांनी “केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधला आणि केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन घटनास्थळांवर कार्यरत आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

केरळमध्ये अतिवृष्टी होऊन काही ठिकानी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या मध्ये काहिजनांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पंतप्रधानांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.