ऐन उन्हाळ्यात ‘विजे’चा लपंडाव, सारखी-सारखी लाईट जात असल्याने ‘केडगावकर’ हैरान

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. ऐन भर दुपारी उन्हाचा चटका वाढला असताना लाईट जाने, किरकोळ कामासाठी सारखी सारखी लाईट घालवणे असले प्रकार या परीसरात सुरु असून विजेच्या या लपंडावाला येथील अक्षरशा वैतागले आहेत.

एक विज बिल थकले तरी महावितरण कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना हैरान केले जाते. विज बिलात सर्व आकार, कर लावले जातात मग विज गेली किंवा त्यात बिघाड झाला तर त्याला पर्यायी व्यवस्था करून देण्याची जबाबदारी कुणाची आहे असा संतप्त सवाल नागरीक उपस्थित करत आहेत. सध्या केडगाव आणि परिसरामध्ये विजेचा मोठा खेळ खंडोबा सुरु आहे. या ठिकाणी मोठी बाजार पेठ आहे. विजेवर चालणारी असंख्य यंत्रे आहेत. त्यावर अवलंबून अनेक व्यवसाय आहेत. मात्र विज गेल्यानंतर ही यंत्रे बंद पडतात आणि याचा मोठा फटका व्यवसायिक आणि दुकानदारांना बसतो.

सध्या मुस्लिम बांधवांचाही पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधवांना उपवास (रोजा) असतो. या उपवासामध्ये दिवसभर एक थेंब पाणीही प्यायचे नसते. अश्या परिस्थितीमध्ये विज गेली तर उपवास ठेवणाऱ्यांचे काय हाल होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.

या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे हेही पाहणे गरजेचे आहे कारण नागरिकांकडून भरमसाठ वीज आकार घेऊन जर त्यांना चांगली सेवा मिळत नसेल तर यावर कारवाई करण्याची मागणीही अनेकजण करत आहेत.