केडगावचे डॉ. सागर शेळके यांची पी.जोग एज्युकेशनल ट्रस्ट विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालक पदी निवड

पुणे : शहरात सन १९७६ पासून पी.जोग एज्युकेशनल ट्रस्ट यांची शिक्षणविषयक आस्था व समाजात असलेली पत तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नॅकची मान्यता, आयएसओ प्रमाणपञ असलेली शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय असून यावर्षी नव्याने विधी महाविद्यालयाची सुरुवात झाली आहे.

या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी तसेच पी.जोग.एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या पी.जोग गृप ऑफ इन्स्टीट्युटच्या संचालकपदी डॉ. सागर शेळके-पाटील यांची निवड झाली. नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र संस्थेचे खजिनदार डॉ. अमोल जोग यांनी दिले.

हाच का केडगावचा विकास

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. सुरेखा जोग, संस्थेचे सेक्रेटरी पुष्कर जोग, विश्वस्त सौ.शुभदा जोग व खजिनदार अमोल जोग यांनी डॉ.शेळके-पाटील यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

संशोधन व महाविद्यालय प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ. शेळके-पाटील यांनी यापुर्वी प्र.प्राचार्य, संशोधन विभाग प्रमुख, कौंटुबिक कायदेशीर सल्ला केंद्र विभाग प्रमुख, अधिष्ठता, रजिस्ट्रार इत्यादी पदे भुषवली आहेत.

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. शेळके-पाटील म्हणाले की, “नियुक्तीबद्दल संस्था पदाधिकारांचे आभार व संस्थेच्या ध्येय धोरणानुसार विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व सहकार्यांच्या साथीने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेला व महाविद्यालयाला सर्व स्तरावर प्रगतिशील ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन.”