Categories: खेल

दौंड’मध्ये कटारिया महाविद्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन, वरवंडच्या आय.टी.आय. संघाने अंतिम सामन्यात मारली बाजी

दौंड : भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्ताने संस्थेच्या स्वर्गीय कि. गु. कटारिया महाविद्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अमित सोनवणे, गणेश पवार, मुख्याध्यापिका समीना काझी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांनी उपस्थित विद्यालय प्रतिनिधींचे स्वागत केले. स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होते. वरवंडच्या आय.टी.आय. कॉलेज संघाने अंतिम सामन्यात बाजी मारून विजेतेपद पटकाविले. के.जी. कटारिया महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू प्रसाद धीवार यांनी पंच म्हणून कामगिरी बजाविली. स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विकास शेलार यांनी केले. शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाचे उपशिक्षक संताजी आटोळे, उमेश पलंगे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश साखरे यांनी केले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे खेळाडू व सेवकांचे सहकार्य लाभले अशी माहिती महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे यांनी दिली.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

3 दिवस ago

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते गुंगारा

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते…

4 दिवस ago