दौंड : हैदराबाद येथे झालेल्या सातव्या ऑल इंडिया ओपन कराटे स्पर्धेमध्ये दौंड मार्शल आर्ट्स बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूल व ईशांत स्पोर्ट्स कराटे असो. पुणे व आळंदीच्या खेळाडूंनी मोठे यश संपादन केले. स्पर्धेतील 750 खेळाडूं मधून येथील पाच खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविले. हैदराबाद येथील कोतला विजया भास्कर रेड्डी स्टेडियम येथे पार पडलेल्या स्पर्धेत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील 750 खेळाडूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू:
सुवर्णपदक- विराज पवार, अंजली राठोड, तनय काकडे, शुभम वाघ,प्रज्वल लोणकर.
रौप्यपदक- गिरीश घाडगे, स्वराज सोनवणे, ओमकार गरुड, योगिता आलम, विद्या पोकार, आयुष्य भोसले.
कांस्य पदक- स्वरा सोनवणे, वीरश्री मचाले, सिद्धी लोटके, कोमल तावरे, कादंबरी शिंदे, सिद्धी आव्हाड, वैशाली गुजर, अक्षरा लांडे, समृद्धी बनिक, नमिता शिंदे, जिगीशा भंडारी, मृण्मयी भागवत, दीपिका जाधव, आदित्य दरबारी, वंश शेट्टी ,हर्ष पोकार अभिनव काळे, कृणाल विंचुरकर.
सर्व यशस्वी खेळाडूंना सिनेअभिनेते डॉ. सुमन तलवार व आयोजक संजय इंगोले या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. राजेंद्र साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे संतोष यांचे खेळाडूंना प्रशिक्षण लाभले. हिरालाल साळवे, गणेश फुंदे, सपना गुजर, श्रुती कटारिया यांचे विशेष सहकार्य मिळाले.