दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड पोलीस स्टेशनला नुकतेच ISO A+ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. पोलीस स्टेशन च्या कार्यपद्धतीत झालेला बदल, गुन्हे अभिलेख, गुन्ह्यात झालेली लक्षणीय घट, अंतर्गत प्रशासकीय बाबींमध्ये केलेली सुधारणा या सर्व बाबींचा विचार करून मानांकन दिले जाते.
स्वातंत्र्य दिनाच्या औचीत्यावर पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सदर मानांकनाचे प्रशस्तीपत्रक दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वीकारले. यावेळी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.