पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अंतरराष्ट्रीय ‘योग दिन’ उत्साहात साजरा

पुणे / दौंड : स्वातंत्र्याचे अमृत मोहोत्सवी वर्ष आणि 21 जून ह्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचूत्य साधून पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला. यात हवेली, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, मावळ, मुळशी,भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, वेल्हे या तालुक्यांतील शाळांनी विशेष सहभाग नोंदवला.

दौंड येथेही अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट (दौंड) यांचे वतीने येथील रामकृष्ण लॉन्स येथे सकाळी 6:00 ते 7:30 यावेळेत योगा आणि प्राणायाम घेण्यात आला. बहुसंख्येने योग प्रेमी यावेळी उपस्थित होते. पतंजली योग समितीचे अध्यक्ष राजू गजधाने यांनी योगाचे प्रातीक्षिके करून दाखवण्या बरोबर योगाचे महत्व निरोगी आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे हे सांगत मंत्र मुग्न करून ध्यान प्राणायाम घेतला.

यावेळी प्रमुख पाहुणे विरधवल जगदाळे (संचालक दौंड शुगर), डॉ. सुनीता कटारिया, वैभव महाराज कांबळे, राजेंद्र ओझा, अशोक गायकवाड,वैभव टाटिया, बाळकृष्ण साळुंके, सचिन कुलथे, भवर धुमावत सह पतंजली योग समिती चे असंख्य योग साधक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली ..