आंतरराष्ट्रीय : जगात कोरोना संकट सुरू असताना इस्राईल आणि पॅलेस्टिनमध्ये (israel palestine) सुरू झालेल्या खुनी लढाईने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मस्जिद ए अक्सा मध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर इजराईल बाबत मुस्लिम देशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर या बाबत भारत काय भूमिका घेतो (India support palestine) याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मात्र भारत देशाने इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आता आपली भूमिका स्पष्ट करताना संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पॅलेस्टाइनला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत टाईम्स ग्रुप आणि महाराष्ट्र टाईम्सनेही अधिकृतरित्या हे वृत्त छापले आहे.
आणि पॅलेस्टिन आणि इस्राईल (israel palestine) या दोन्ही देशांनी सुरू असलेले रक्तरंजित हिंसाचार तातडीने थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारताने सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.
भारताचे प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती यांनी
भारताची भूमिका
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत मांडताना पॅलेस्टिन आणि इस्राईल संघर्षावर आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणाऱ्या कारवाया रोखण्याचे आवाहन करत असल्याचे आवाहन केले आहे. आणि जेरूसलेम पूर्व (पॅलेस्टिनचा भाग) आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील सद्य स्थिती एकतर्फी बदलण्याचे प्रयत्न करण्यात येऊ नयेत असे भारताने म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर पॅलेस्टिनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. दोन्ही देशात मारल्या गेलेल्या नागरिकांबाबत भारताने दुःख व्यक्त केले असून यात एक भारतीय महिला मृत्युमुखी पडल्याने तिलाही श्रद्धांजली वाहिली आहे.