बापाच्या डोक्यात दगड घालून मुलानेच केला बापाचा ‘खून’, मुलगाच आला अज्ञाताच्या विरोधात फिर्याद द्यायला पण… असा झाला खुणाचा उलगडा

पुणे : बापाच्या त्रासाला कंटाळुन मुलाने केला बापाचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची खळबळजनक घटना इंदापूरच्या मदन वाडीत घडली आहे.
आज दिनांक.२३/०३/२०२२ रोजी सकाळी ०८/१५ वा.चे सुमारास राजेंद्र छगन
कुंभार (रा.मदनवाडी,ता इंदापुर,जि,पुणे) याने भिगवण पोलीस स्टेशन येथे येवुन कोणीतरी अज्ञात इसमाने माझे वडील छगन गजानन कुंभार यांचे डोक्यात दगड टाकुन त्यांचा खुन केला आहे अशी माहीती दिली. यावेळी भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ तपास पथके तयार करून घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी मयत इसम छगन कुंभार यांचा मुलगा खबर देणार राजेंद्र छगन कुंभार याच्याकडे सखोल विचारपुस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो उडवाउडीची उत्तरे देऊन पोलीसांची दिशाभुल करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने वडील छगन कुंभार हे दारू पिवुन रोज शिवीगाळ करायचे, रात्री अपरात्री घराच्या बाहेर काढून हाकलून द्यायचे हा त्रास असह्य झाल्याने कंटाळुन वडील झोपेत असताना रात्रौ दोन वाजण्याच्या सुमारास वडील गाढ झोपेत असताना त्यांचे
डोक्यात दगड घालुन त्यांचा खुन केल्याचे कबुल केले.

सदरची कामगिरी मा. डॉ अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते साो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे साो, उपविभागीय पोलीस
अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, रूपेश कदम, सुभाष रूपनवर, पोलीस अंमलदार नाना वीर, समीर करे,सचिन पवार,महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, आप्पा भांडवलकर यांनी केली आहे.