पुरंदर : पुणे कुरकुंभ ता. दौंड येथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडल्यानंतर पुरंदर तालुक्यातील कोडीत या गावात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणकडून अफू ची शेती करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी अफुची बेकायदेशीर लागवड करून उत्पादन घेणाऱ्या दशरथ सिताराम बडधे (वय ६५ वर्षे) व तान्हाजी निवृत्ती बडधे (वय ६९ वर्षे, दोघे रा. कोडीत ता. पुरंदर, जि. पुणे) या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून उत्पादन घेवतून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोकशेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत. वरील इसमांनीही तसाच प्रयत्न केला आहे.
असा लागला तपास… दि. २४/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत कोडीत ता. पुरंदर जि. पुणे या गावातील इसम दशरथ बडधे व तान्हाजी बडधे हे त्यांच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफुची लागवड करून उत्पादन घेत असल्याचे समजले. सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड व राजगड पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व स्टाफच्या मदतीने राजपत्रीत अधिकरी व पंचांसह मलाईवस्ती लगतच्या दोन वेगवेगळया शेतात जावून पाहणी केली यावेळी या शेतामध्ये उपस्थित इसम दशरथ सिताराम बडधे व तान्हाजी निवृत्ती बडधे यांना ताब्यात घेण्यात आले. एकूण १०किलो ५०० ग्रॅम वजनाची अफुची ओली बोंडे जप्त करण्यात आली. या ठिकाणी अफुची लागवड केलेली दिसून येवू नये या करीता शेतात कांदा व शेवंती फुलांची लागवड करण्यात आलेली होती.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती उपविभाग अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, भोर, सासवड चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पांडुळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचेपो. नि. राजेश गवळी, स्था. गु. शा. चे सपोनि राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजयकांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगड्डु त्रिरकर, सासवड पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, प्रतिक धिवार, मपोना करंडे, पोना भुजबळ यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बाजीराव ढेकले, सासवड पोलीस स्टेशन हे करत आहेत.