लोकसभा निवडणूक २०२४
पुणे : लोकसभेसाठी आज दि.७ मे रोजी एकूण अकरा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत असून आज दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. यावेळी मतदानासाठी नागरिकांचा उत्साह कमी दिसत आहे. उन्हामुळे सकाळी जास्त मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र तसे होताना दिसले नाही.
दुपारी एक वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि टक्केवारी – ➡️लातूर – ३२.७१
➡️सांगली – २९.६५
➡️बारामती – २७.५५
➡️हातकणंगले – ३६.१७
➡️कोल्हापूर – ३८.४२
➡️माढा – २६.६१
➡️उस्मानाबाद -३०.५४
➡️रायगड – ३१.३४
➡️रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१
➡️सातारा – ३२.७८
➡️सोलापूर -२९.३२
वरील अकरा लोकसभा मतदार संघामध्ये एकूण ३१.५५ टक्के इतके मतदान झाले आहे. कमी मतदानाचा कुणाला फटका बसतो हे पुढील महिन्यात समजणार आहे. दुपारनंतर अजून मतदानाची टक्केवारी किती वाढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.