पुणे : आज झालेल्या अकरा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान हे बारामती लोकसभा मतदार संघात झाले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ४५.६८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्या खालोखाल सोलापूर ४९.१७ टक्के इतके मतदान झाले होते.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत अकरा मतदार संघाची आकडेवारी खालील प्रमाणे
- लातूर- ५५.३८
- सांगली- ५२.५६
- बारामती- ४५.६८
- हातकणंगले- ६२.१८
- कोल्हापूर- ६३.७१
- माढा- ५०.००
- उस्मानाबाद- ५२.७८
- रायगड- ५०.३१
- रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५३.७५
- सातारा- ५४.११ टक्के
- सोलापूर- ४९.१७ टक्के
वरील आकडेवारी पाहता कमी टक्केवारीचा फटका कुणाला बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात झालेल्या विविध युत्या आणि आघाड्या ह्या लोकांच्या पसंतीस उतरल्या नसल्याने आकडेवारी घटल्याचे काहीजण सांगत आहेत तर उन्हामुळे नागरिक मतदानाला आले नसल्याचे काहीजण सांगत आहेत.