‛भोर’ च्या आयडीबीआय बँकेला 38 लाख 18 हजारांचा ‛चूना’..! खोटे ‛सोने’ तारण ठेऊन 5 जणांकडून बँकेची फसवणूक, 3 ग्राहक आणि 2 सराफांचा समावेश

भोर : आयडीबीआय बँकेच्या भोर शाखेमध्ये ३ इसमांनी तब्बल ३८ लाख १८ हजार ५०० रुपयांचे खोटे सोने तारण ठेऊन बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ते सोने खोटे असल्याचे माहीत असतानाही ते खरे सोने असल्याचे बँकेने नेमलेल्या दोन सोनारांनीच सांगितल्याने बँकेने हे कर्ज दिले होते. त्यामुळे तीन इसम आणि दोन सोनार असा पाच जनांनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी १) विद्याधर माधवराव टापरे (रा.टापरेवाडी ता.भोर जि. पुणे) याने ८८४.५० ग्रॅम खोटे सोने ठेवुन बँकेकडुन १४ लाख ८८ हजार ५०० रुपये कर्ज घेतले, आरोपी नंबर २) गणेश भागोजी माजगुडे
(रा. टापरेवाडी ता. भोर जि. पुणे) याने
६९३ ग्रॅम खोटे सोने ठेवुन बँकेकडुन
१४ लाख ३० हजार रुपये कर्ज घेतले तर आरोपी नंबर ३) विकास संपत सावंत (रा. टापरेवाडी ता.भोर जि.पुणे सध्या रा. धनकवडी पुणे) याने २८४ ग्रॅम खोटे सोने ठेवुन बँकेकडुन नुतणीकरण करुन ९ लाख रुपये कर्ज घेतले होते. वरिल सर्व आरोपींनी आयडीबीआय बँक शाखा भोर (ता.भोर जि. पुणे) येथे एकुण १,८६१ ग्रॅम सोने ठेवुन बँकेकडुन एकुण ३८ लाख १८ हजार ५०० रुपये कर्ज घेवुन बँकेचा विश्वासघात करुन फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच आरोपी नंबर ४) नंदकुमार किसन कामळे (रा. रावळ चौक, मंगळवार पेठ, भोर) आरोपी नंबर ५) चेतन अशोक बेलापुरकर (रा.पोस्ट ऑफिस शेजारी शिरवळ) हे बँकेने नेमलेले सोनार असतानाही त्यांनी सदरचे सोने खोटे आहे हे माहित असताना देखील सदर सोन्याची शुध्दता मुल्याकंन करुन ते खरे असलेचे प्रमाणपत्र देवुन विश्वासघात करुन बँकेची फसवणुक केली आहे. म्हणुन आयडीबीआय बँक शाखा भोर यांचे वतीने बँकेचा प्रतिनिधी म्हणुन कुंजन शारदानंद तिवारी (बँक शाखा प्रमुख) यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. पुढील तपास भोर पोलीस करत आहेत.