सुधीर गोखले
सांगली : मी आणि आम गोपीचंद पडळकर एकत्र असल्याने लोकसभा निवडणुकीत माझे मताधिक्य ९ लाखांच्या वर जाईल असा दावा सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे.
मी काही जत्रेतील पैलवान नाही मी रोजच व्यायाम करतो जत्रा जवळ आली म्हणून व्यायाम करत नाही माझी तयारी हि सुरूच असते. मागील निवडणुकीत मला ६ लाख मते मिळाली होती तर आम गोपीचंद यांना ३ लाख मते होती यंदा आम्ही एकत्र असल्याने विरोधकांना चांगलेच पाणी पाज असेही त्यांनी म्हटले आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत वीज बिलावर होणार मोठा खर्च टाळण्यासाठी सुमारे २०० मेगा वॉट चा चौदाशे कोटी रुपयांचा वीज प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केला आहे. त्याचबरोबर म्हैसाळ विस्तारित योजनेसही मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या दोन्ही योजनांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य शासन विस्तारित प्रकल्पासाठी ७९२ कोटी रुपये देणार आहे विस्तारित योजनेसाठी जात तालुक्याची मोठी मागणी बऱ्याच काळापासून होती ती आता पूर्णत्वास जाऊन जवळजवळ ६५ गावांना याचा लाभ होईल.
सौर ऊर्जेसाठी सन २०२१ मध्ये प्रस्ताव दिला होता एका आंतरराष्ट्रीय लेखा परीक्षण संस्थे मार्फत या योजनेचा सर्वे करण्यात आलासौर प्रकल्पास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे किमान २४ ते २६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल हि योजना वीजबिलाबाबत स्वयंपूर्ण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा भार सोसावा लागणार नाही या कामाचीही लवकरच वर्क ऑर्डर दिली जाईल. महापालिका निवडणुकीत लक्ष घालणार
महापालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत पक्षानेही जबाबदारी दिली आहे त्यामुळे लक्ष घालणार असल्याचे खा पाटील यांनी यावेळी सांगितले
टेम्भू योजनेसाठीही प्रस्ताव देऊ
म्हैसाळ योजनेप्रमाणे टेम्भू योजनाही सौर उर्जेवर चालवण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल या योजनेसाठीही सर्वे केला जाईल जिल्ह्यातील अशा सर्व योजना सौर उर्जेवर चालल्या तर त्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होतील.