‘आमदार राहुल कुल’ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सहकारनामा’ च्या विशेष पुरवणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

दौंड : दौंड तालुक्याचा आवाज आणि दौंड तालुक्यातून प्रसिद्ध होणारे सहकारनामा वृत्तपत्र गेल्या सहा वर्षांत वाचकांची मने जिंकण्यात आणि जनतेच्या मनाचा अचूक वेध घेण्यासयशस्वी झाले आहे. त्यामुळे सहकारनामा वृत्तपत्रासह, सहकारनामा युट्युब चॅनेल आणि सहकारनामा न्यूज पोर्टल हे जनतेच्या पसंतीस उतरले आहे.

आमदार राहूल यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी सहकारनामा पुरवणीला विशेष प्रतिसाद दिला

काल आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारनामा च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाढदिवस विशेष पुरवणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या विशेष पुरवणीचे अनावरण दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजनाताई कुल आणि भाजप च्या अध्यक्षा कांचनताई कुल यांच्या हस्ते करण्यात आले.

कुल यांचा वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यातील कुल गटाचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी ‘सहकारनामा’ वृत्तपत्राच्या माध्यमातून आमदार राहुल कुल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सहकारनामा वृत्तपत्राचे हे सहावे वर्ष असून दौंडकरांचे हक्काचे वृत्तपत्र म्हणून सहकारनामा ची ओळख बनली आहे. सहकारनामा वृत्तपत्रासह सहकारनामाचे न्यूजपोर्टल आणि युट्युब चॅनेलही लोकांच्या पसंतीस उतरले आहे.