अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील वाटलूज येथे राहणाऱ्या मुलाणी कुटुंबावर अचानक संकट ओढावले. त्यांचा हसता खेळता चिमुकला सोफियान त्याला अचानक उद्भवलेल्या श्वासाच्या त्रासाने बोलायचा बंद झाला, त्याला आलेल्या तापाने अतिउच्च पातळी गाठली. त्याची ही परिस्थिती पाहून बारामती येथील हॉस्पिटलनेही हात वर केले अण या चिमुकल्याला त्वरित पुण्याला घेऊन जा असा सल्ला दिला. मुलाणी कुटुंबाला काय करावे हे सुचत नव्हतं. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि पुण्यातील हास्पिटलचे होणारे बिल अण मुलाची बिकट अवस्था यामुळे मुलाणी कुटुंब पुरते हतबल होऊन गेले.
यावेळी सोफियान चे वडील अल्ताफ यांनी आपल्या मित्रांशी चर्चा केली आणि ऐन अधिवेशनाच्या काळात मंत्रालयात कामकाजात व्यस्त असलेल्या आमदार राहूल कुल यांचा फोन खनाणला. त्या परिस्थितीतही दादांनी तो फोन घेतला आणि त्या चिमुकल्या सोफियानची परिस्थिती ऐकून तुम्ही काळजी करू नका, मी पाहतो काय करायचे ते, तुम्ही त्वरित त्या मुलाला पुण्यातील हॉस्पिटल मध्ये दाखल करा, पुढील व्यवस्था मी करतो असे म्हणून त्यांनी आरोग्य यंत्रनेचे काम पाहणाऱ्या व्यक्तींना सुचना दिल्या. मुलाणी कुटुंबाने सोफियानला त्वरित हडपसर, पुणे येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सोफियानला ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्याची परिस्थिती बिकट होती. त्याच्या श्वसनमार्गात उद्भवत असलेले अडथळे आणि भयंकर तापाने त्याची अवस्था पहावत नव्हती. आमदार राहुल कुल यांच्या संपर्काने हास्पिटलमध्ये त्या मुलाची विशेष काळजी घेण्यात आली आणि मोठ्या संकटातून सोफियान सहिसलामत बाहेर आला. आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांची अनमोल अशी मदत सोफियानला मिळवून दिली.

सोफियान ठीक होताच त्याच्या कुटुंबियांनी सोफियानसह आमदार राहुल कुल यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले. आमदार राहुल कुल यांना आरोग्यदूत अशी पदवी दौंडकरांनी बहाल केली आहे. त्या पदवीचा प्रत्यय आज पुन्हा दौंडकरांना आला आहे.