अर्धे ‘धड’ दौंडला, तर मुंडके यवतला ! दौंड तालुक्यात उघडकीस आला ‘खुनाचा’ धक्कादायक प्रकार

दौंड : दौंड तालुक्यात खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका इसमाचा खून करून त्याचे अर्धे धड दौंड जवळील भीमा नदी पात्रता टाकण्यात आले तर धड नसलेले मुंडके हे यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात आढळून आले. हे मुंडके हे याच धडाचे असावे असा पोलिसांना संशय असून याबाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला खुनाचा उलगडा… खुनाची ही घटना पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून व पोस्ट मार्टम रिपोर्टवरून उघडकीस आली असून मा. वैद्यकीय अधिकारी, ससून हॉस्पिटल पुणे यांनी सदर मयताचे काढून घेतलेले डी. एन. ए. सॅम्पल सहाय्यक संचालक, वैज्ञानिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळा गणेश खिंड पुणे यांना रासायनिक
विश्लेषन होवून अभिप्राय मिळणे बाबत पाठवून दिले होते.

या नंतर असे निष्पन्न झाले की, दिनांक ०२/१०/२०२३ रोजी दुपारी १२.०० च्या पुर्वी साठेनगर, दौंड हद्दीतील भिमा नदीच्या किनारी मोगेश झोजे यांच्या विटभट्टी जवळ कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून एक अनोळखी पुरुषाचा धारधार हत्याराने खून करून त्याच्या कमरे खालील भाग पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भिमा नदी पात्रात फेकून देवून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. या मयत इसमाचा कमरेखालील भाग सापडला असला तरी त्याच्या शरीराचा बाकी भाग कुठे आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

अर्धे धड दौंडला तर मुंडके यवतला मग बाकीचा भाग कुठे ? खुनाची ही घटना गंभीर असून अर्धे धड दौंड मिळाले असताना एका इसमाचे नुसते मुंडके हे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नदी पात्रात सापडले असल्याची माहिती मिळत आहे. हे मुंडके त्याच धडाचे असावे असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र मुंडके यवतला, अर्धे धड दौंडला तर बाकी शरीराचा भाग कुठे असेल हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. घटनेचा अधिक तपास दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.