पालक मंत्र्यांची ‘आ. राहुल कुल’ यांसह ‘केडगावला’ धावती भेट, भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

दौंड : अकोल्याचे नवनियुक्त पालकमंत्री महसूल, पशुसंवर्धन, तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अचानक दौंड तालुक्यातील केडगाव येथे धावती भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते. एका कार्यक्रमानिमित्त ते या ठिकाणी आले होते त्यावेळी त्यांनी केडगाव येथील व्यापारी बंधुंनी केलेला सत्कार स्वीकारला.

अकोल्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वागत करताना व्यापारी बंधू

कार्यक्रमानिमित्त केडगावला भेट, भाजप व्यापारी संघटनेकडून सत्कार… आज एका कार्यक्रमानिमित्त राज्याचे महसूलमंत्री तथा अकोल्याचे नवनियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे केडगाव या ठिकाणी आले असताना केडगाव येथील व्यापारी आणि भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी व्यापारी बंधुंच्यावतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटलांना आता 350 कि.मी चा प्रवास करावा लागणार… काल राज्यातील नवनियुक्त पालकमंत्र्यांची सूची जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर अकोल्याच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अकोला ते अहमदनगर हे अंतर सुमारे 350 कि.मी इतके असून त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे आता त्यांना अनेकवेळा हे मोठे अंतर मात्र पार करण्याची कसरत करावी लागणार आहे.