आ.राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नातून केडगाव येथे प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन

केडगाव, दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गौण खनिज निधीतून केडगाव गाव येथे प्राथमिक शाळा या ठिकाणी दोन आरसीसीच्या नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम मंजूर झाले होते. आज मान्यवरांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करून काम सुरु करण्यात आले.

हा भूमिपूजन कार्यक्रम आज दि. ३० जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता प्राथमिक शाळा केडगाव या ठिकाणी पार पडला. यावेळी भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक किरण देशमुख, केडगावातील जेष्ठ नागरिक केंजळे मामा,  ग्रामपंचायत सदस्य निलेश कुंभार, माजी सरपंच विठ्ठल शेंडगे, डॉ.लोणकर, झेड पी शाळेचे मुख्याध्यापक वाल्हेकर सर, ज्ञानदेव जगताप, हनुमंत जगताप, संतोष कुंभार, माजी सदस्य पिंटू शेंडगे, अशोक शेंडगे, राजेंद्र गायकवाड, फारुख शेख, रमेश बेळगल, मल्हारी शेंडगे, कॉन्ट्रॅक्टर शितोळे, राहुल गोरगल यांसह केडगावातील जेष्ठ आणि विविध पदांवर असणारे मान्यवर उपस्थित होते.

या ठिकाणी दोन वर्ग खोल्यांसाठी जवळपास एक हजार चौरस फूट इतके आरसीसी बांधकाम होणार असून केडगाव गावामध्ये पहिल्यांदाच प्राथमिक शाळेत आरसीसी बांधकाम होणार आहे. याचा फायदा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होणार असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह आता दर्जेदार आरसीसी बांधकाम असणारी शाळाही मिळणार आहे.