‛अशोक बाबा जाधव’ बनले गरिबाचा ‛आधार,’ स्वखर्चातून केले आपल्या कामगाराचे ‛लग्न’

दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी, चौफुला येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचे मालक आणि महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक (बाबा) जाधव यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील युवकाच्या लग्नाला सर्व खर्च उचलत त्याचे जंगी लग्न लावून देत आपल्या बहुमूल्य अश्या कार्यातून सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा चुणूक दाखवून दिली आहे.

न्यू अंबिका कला केंद्राचे मालक अशोक बाबा जाधव आणि संचालिका जयश्री ताई जाधव हे आपल्या सामाजिक कार्यासाठी या परिसरात प्रसिद्ध आहेत. कुठलाही सण असो वा सामाजिक उपक्रम, ते त्यामध्ये आवर्जून आपला सहभाग नोंदवताना दिसतातच. दर वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी ते आवर्जून जेवण आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम ठेवत असतात हे विशेष.

अशोक बाबा जाधव आणि मंगळवार दि. 4 जानेवारी रोजी वर विकी उजागरे आणि वधू नेहा भोसले यांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला. या लग्नाला येणारा संपूर्ण खर्च स्वतः अशोक बाबा जाधव यांनी करत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या लग्नाला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये भीमा पाटस चे मा.संचालक धनाजी शेळके, वाखारी गावच्या सरपंच सौ.शोभाताई शेळके, तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता.