ED सरकारने प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये : खा.सुप्रिया सुळे

पुणे : पीएमपीएमएलने (PMPML) पुणे शहराच्या लगत असणाऱ्या व दौंड, मुळशी, पुरंदर, वेल्हा खडकवासल्याच्या ग्रामीण भागातील बससेवा बंद केली आहे. ती पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे. याबाबत मी ट्विट देखील केले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये आणि शिक्षणातर अजिबातच राजकारण होता कामा नये असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले आहेत.

त्यांनी राज्यसरकारला विनंती करताना, माझी राज्य शासनाला विनंती आहे की, पीएमटीमधून लाखो मुले शिक्षणासाठी पुण्याला येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनाही तो अधिकार आहे कारण ते देखील राज्याचे देशाचे नागरिक आहेत. अगोदर ही बससेवा सुरु होती. अजितदादा पालकमंत्री असताना आपण बससेवेत वाढ केली होती. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, जेष्ठ नागरिक यांना त्याचा फायदा होत होता.पण आता पीएमटीने नवीन नियमावली केली आहे त्याअंतर्गत ही सेवा बंद केली आहे.

आपण पायाभूत सुविधा, रस्ते, मेट्रो यासाठी ज्याप्रमाणे निधी दिला जातो मग विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निधी का दिला जावू शकत नाही. शिवाय या पीएमटीचा खर्च खुप कमी आहे. त्यामुळे माझी ED सरकारला विनंती आहे की ग्रामीण भागातील बंद केलेली सेवा पुन्हा एकदा मुलांसाठी सुरू करावी कारण ती फार संघर्ष करुन शिकत असतात. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही सेवा पुन्हा एकदा सुरु करावी ही विनंती असा संदेशही खा.सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकारला दिला आहे.