पुणे : पुणे वन विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या वन क्रीडा स्पर्धेमध्ये दौंड चे सुपुत्र सरवर सफिर खान (वनपरिक्षेत्र अधिकारी) यांच्या टीमने व्हॉलीबॉल (सांघिक) या खेळात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक जिंकले तर कॅरम स्पर्धेमध्ये खान यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत वयक्तिकरीत्या यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळविले तसेच थाळी फेक या क्रीडा प्रकारात त्यांचा दुसरा क्रमांक आल्याने ते येथेही रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत.
या स्पर्धा दि.4 जानेवारी ते 5 जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठाण येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सोलापूर वन विभाग, पुणे वन विभाग आणि जुन्नर वन विभागाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलिबॉल, कबड्डी, महिला हॉलिबॉल या सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला होता तर वयक्तिक मध्ये कॅरम, चेस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक या खेळांचा समावेश होता.
सरवर खान यांनी कॅरम (वयक्तिक) आणि हॉलिबॉल (सांघिक) या क्रीडा प्रकारात सुवर्ण तर थाळीफेक या क्रीडा प्रकारात रोप्य पदक पटकावले. या स्पर्धा क्रीडा संकुल बारामती आणि विद्या प्रतिष्ठाण बारामती येथे पार पडल्या.