दौंड : दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल विजयी झाल्यानंतर रुग्ण सेवक योगेश घाटे यांनी उज्जैनच्या जय महाकाल देवाला जाऊन केलेला नवस फेडला असून आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद मिळावे म्हणून पुन्हा नवस केला आहे.
योगेश घाटे हे आमदार राहुल कुल यांच्यासाठी रुग्ण सेवक म्हणून कार्य करतात. तालुक्यातील रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी येणारे अडथळे योगेश घाटे यांच्या माध्यमातून दूर केले जातात. दौंड विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल विजयी व्हावेत यासाठी उज्जैन येथील महाकाल देवाला त्यांनी नवस केला होता.
आमदार राहुल कुल विजय झाल्यानंतर त्यांनी नवस फेडला असून कुल यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ‘आरोग्यमंत्री’ म्हणून काम करण्याची संधी मिळावी यासाठी पुन्हा उज्जैनच्या महाकाल देवाला नवस केल्याचे घाटे यांनी सांगितले आहे.