|सहकारनामा|
दौंड : सखी महिला फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा, नगरसेविका,ऍड व नोटरी (भारत सरकार) अरुणा दिलीप डहाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल मुंबई येथील ग्लोबल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. डहाळे यांना शिक्षक दिनानिमित्त खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार बळीराम पाटील, झी मीडियाच्या वरिष्ठ निवेदिका अनुपमा खानविलक- शितोळे, शिक्षण संचालक माळी यांच्या हस्ते सण 2021 या आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अरुणा डहाळे सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, कला, आरोग्य क्षेत्रात अनेक वर्ष झोकून देत कार्य करीत आहेत. त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण असल्या मुळेच त्यांचा आज पर्यंत संघर्षमय प्रवास सुरू आहे. महिलांवरील अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करण्या बरोबरच अनेक महिला बचत गटांची स्थापना करून त्यांनी निर्मित केलेल्या वस्तू व पदार्थांचे प्रदर्शन आयोजित करून त्यांची विक्री करण्यासाठीचे मार्केटिंग सुद्धा डहाळे करीत असतात. त्यांच्या या सर्व कार्यांची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.