भिगवण : ए.टी.एम (ATM) सेंटरमध्ये आलेल्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांचे ए.टी.एम बदली करून नंतर त्यांच्या ए.टी.एम. मधून लाखो रुपये काढणाऱ्या टोळीचा भिगवन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भिगवन पोलिसांनी मुंबई, ठाणे भागातून यातील 3 आरोपिंना जेरबंद करत 51 ए.टी.एम कार्ड आणि 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवन (ता.इंदापूर) येथे दिनांक.१६/०३/२०२३ रोजी दुपारी १२:३८ वा चे सुमारास प्रभु मेडीकल येथील हिताची ए.टी.एम सेंटरमध्ये फिर्यादी हेमंत बापुराव गोफणे, (रा. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे) हे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील अनोळखी इसमाने त्यांना मी पैसे काढून देतो असा विश्वास देवुन त्यांच्या ए.टी.एम.चा पासवर्ड माहीती करून घेतला. नंतर त्याने हातचलाकी करून त्याच्या जवळील बनावट ए.टी.एम. कार्ड गोफणे यांना देवुन त्यांच्या ए.टी.एम कार्डच्या सहाय्याने ठिक ठिकाणाहुन फिर्यादीचे संमतीशिवाय त्यांचे एच.डी.एफ.सी बँकेच्या ए.टी.एम. मधुन वेळोवेळी १,३०,३००/- रुपये रोख रक्कम काढली. याबाबत फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथक (डी.बी) यांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील अज्ञात
आरोपी यांचे तांत्रिक विश्लेषण व ए.टी.एम सेंटर मधील कॅमेरे, टोलनाक्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध घेवुनत्या द्वारे अधिक माहीती प्राप्त केली आणि आरोपींची ओळख पटवली. या आरोपिंचा मुंबई, ठाणे, याभागात शोध घेवुन त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले. त्यामध्ये आरोपी (१) अहमद इस्तियाक
अली, (वय.२७ वर्ष, रा. मेढावा, कैथाला, ता. जि. प्रतापगढ, राज्य उत्तर प्रदेश) (२) जैनुल जफरल हसन, (वय.२८ वर्ष, रा. कमलानगर, चिंतामणी हॉटेल जवळ, बाईगणवाडी, गोवंडी, मुंबई मुळ रा. मेढावा, कैथाला, ता. जि.
प्रतापगढ, राज्य उत्तर प्रदेश) (३) इरफान रमजान अली, (वय. १९ वर्ष, रा. बजापुर, माझीगाव, ता. जि. प्रतापगढ, राज्य उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. त्यांना ताब्यात घेवुन पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
या आरोपिंकडून वरील गुन्ह्यातील फिर्यादीचे ए. टी. एम. व अपहृत केलेली १ लाख ३० हजार ३०० रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वॅगन आर कार नंबर. एम. एच. ०३ / बी.सी. ६३८६, व
विविध बँकांचे एकुण ५१ ए.टी.एम कार्ड असा एकुण ५,१०,३००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला
आहे. आरोपी यांचे ताब्यात मिळुन आलेल्या ५१ ए.टी.एम कार्डच्या आधारे त्यांचे मुळ मालक यांचा शोध घेवुन
त्यांचेशी संपर्क साधुन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
भिगवन पोलिसांकडून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद
वरील ए.टी.एम. कार्ड चोरी करणारी टोळी पकडल्यानंतर दिनांक. २९/०३/२०२३ रोजी रात्रगस्त दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार महेश उगले व अंकुश माने हे रात्रगस्त करीत असताना दोन संशयीत इसम (१) सौरभ विष्णु इंगळे, (वय.२०
वर्ष, रा. पारवडी, ता. बारामती, जि. पुणे) व (२) किरण अनिल मदने, (वय २२ वर्ष, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) हे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी भिगवण पो.स्टे गुरनं. १२० / २०२३, भादवि कलम ३७९ प्रमाणे बारामती भिगवण रोडवरील पोकलेन मशिनमधुन ४२हजार रुपयांची डिझेल चोरी
केली असल्याचा गुन्हा कबुल केला आहे. त्यांच्याकडुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार, (भिगवण पो.स्टे.) पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, रणजीत मुळीक, होमगार्ड चांगन, पोलीस मित्र सुहास पालकर यांनी केली आहे.